Cruiser driver killed by speeding sand tractor : भरधाव वेगातील रेतीच्या ट्रॅक्टरने घेतला क्रूझर चालकाचा बळी; सरसम जवळील घटना -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| भरधाव वेगातील एका रेतीच्या ट्रॅक्टरने क्रुझरला जबर धडक देऊन क्रुझर चालकाचा बळी घेतला आहे. हि दुर्घटना दिनांक २३ च्या रात्री १०.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील सरसम आबादी ते मसोबा नाल्याच्या मधील महादेव मंदिराच्या आसपास घडली आहे. या घटनेनंतर ट्रॅक्टर मालकाने हेड जाग्यावर ठेऊन नंबर असलेली ट्रॉली पळवून नेली आहे. तालुक्यात रात्रीला चोरीच्या पद्धतीने रेतीची वाहतूक केली जात असल्याने भरधाव वेगाने वाहने चालविली जात असल्याने रस्त्याने प्रवास करणाऱ्यांत वाहनधारकात भीती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वच ट्रॅक्टर सारख्या वाहनांची आरटीओ विभागाने तपासणी करून त्याच्यावर वेगामर्यादा लावावी अशी मागणी केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या घरापुर, कोठा, डोल्हारी, पळसपूर, रेणापूर, दिघी, विरसनी, बोरगड...
