Illegal liquor : हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारूचा धुमाकूळ
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, संबंधित पोलीस यंत्रणा व दारूबंदी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दारू विक्रेत्यांचे फावले जात असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. हिमायतनगर तालुक्यातील गावोगावी खुलेआम अवैध दारूची विक्री सुरू असून, काही ठिकाणी तर दिवसाढवळ्या दारूचे अड्डे चालवले जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे.
दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या कुटुंबप्रमुखांच्या कमाईचा मोठा हिस्सा दारूवर खर्च होत असल्याने अनेक घरांमध्ये चूल पेटणेही कठीण झाले आहे. परिणामी, लाडक्या बहिणींना सुखाचे दोन घास मिळणेही दुर्मिळ झाले असल्याचे विदारक वास्तव खेड्यापाड्यात पाहायला मिळत आहे.
दारूबंदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचा आरोप नागरिकांकडून हो...
