Rahul Kardile : पुस्तकामुळेच माणूस घडतो – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड| माणसांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची खरी ताकद पुस्तक वाचनात असते. केवळ कायदे किंवा नियमांच्या आधारे समाजात बदल घडत नाहीत; ते स्वयंप्रेरणेनेच घडतात. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची सवय जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
नांदेड ग्रंथोत्सव 2025 च्या समारोप प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अच्युत बन होते. व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, निरीक्षक प्रताप सूर्यवंशी, राजेंद्र हंबीरे, गोविंद वडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, लहानपणापासून मला वाचनाची आवड आहे. पुस्तकावर केलेली गुंतवणूक आयुष्य...
