MLA Pratap Patil Chikhlikar : कंधारवासीयांच्या आशीर्वादमुळेच आमदार झालो-आमदार प्रताप पाटील चिखलीकर
कंधार, सचिन मोरे| मी तुमचं लेकरू असून तुमचा माझ्यावर हक्क आहे तुम्ही माझ्या प्रत्येक निवडणुकीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. तुमच्या आशीर्वादामुळेच मी आमदार होऊन यशस्वी कामगिरी बजावू शकलो. आगामी निवडणुकीत नगरपरिषद माझ्या ताब्यात द्या. शहराचा चेहरा मोहरा बदलणार अशी ग्वाही लोहा कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली.
कंधार शहरातील ६ कोटी ७४ लक्ष रुपयाच्या विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता आमदार चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते माजी सभापती बाबुराव केंद्रे उमरगेकर, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी स्वप्निल पा लुंगारे, म. जफरोद्दीन, खरेदी विक्री संघाचे चेअरमन किशनराव डफडे,मधुकर पा. डांगे, सा. बा.चे उप अभियंता सुमित पाटील, मुख्याधिकारी भोळे, मारोती गायकवाड, उत्तम पाटील जाधव, दत्तात्रय चंदनफुले, म. आसेफ, निलेश गौर, गंगा...
