Former Chief Minister Ashokrao Chavan : हिमायतनगरात भाजपची शक्तीप्रदर्शन सभा; डॉ. वानखेडे यांना द्या सेवेची संधी – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण
“कमळ दाबा… विकास माझी जबाबदारी!” माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांचा दमदार संदेश
डॉ. वानखेडेंनी लोकांचे प्राण वाचवले… आता शहर वाचवणार!
‘देवाभाऊ’ मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी, निधीची चिंता नाही चव्हाणांचे आश्वासन
हिमायतनगर, अनिल मादसवार| “हिमायतनगरचं मेजर ऑपरेशन करायचं असेल, शहराला नवीन जीवनदान द्यायचं असेल तर अनुभवी शल्यचिकित्सकाप्रमाणे काम करणाऱ्या डॉ. राजेंद्र वानखेडेंना एक संधी द्या,” असे प्रभावी आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण (Former Chief Minister Ashokrao Chavan) यांनी जाहीर सभेत केले.
गेल्या तिस–पस्तीस वर्षांपासून विविध आजारांवर उपचार करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवणारे, स्वच्छ प्रतिमेचे आणि लोकाभिमुख विचारांचे डॉ. राजेंद्र वानखेडे हे भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याचे सांगताना खासदार चव्हाण म्हणाले की, “राजकारणात चांगली माणसं येणं आवश्यक आहे. ज...
