Bjp winner : भाजपचा प्रचंड विजय; ८१ पैकी ४५ जागांवर एकहाती सत्ता, विरोधकांची वाताहत
नांदेड | नांदेड–वाघाळा महानगरपालिका निवडणूक २०२६ चे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट केले आहे. एकूण ८१ जागांच्या या महापालिकेत भारतीय जनता पार्टीने ४५ जागांवर दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. या ऐतिहासिक विजयासह भाजपने महापालिकेच्या सत्तेवर एकहाती कब्जा केला आहे.
निवडणूक निकालानुसार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपने नांदेड शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये प्रभावी कामगिरी करत मतदारांचा विश्वास संपादन केला. प्रभाग क्रमांक ४, ५, ६, ९, १०, १६, १७, १९ व २० यांसारख्या महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भाजपच्या सर्व किंवा बहुसंख्य उमेदवारांनी विजय मिळवला. अनेक प्रभागांमध्ये भाजपने सुफडा साफ करत विरोधकांना संधीच दिली नाही हे स्पष्ट झाले.
काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत मर्यादित यश मिळाले असून, पक्षाच्या वाट्याला एकूण ...
