Friday, May 15

Tag: Bhagyashree Jadhav wins two gold medals

Bhagyashree jadhav : जागतिक फाजा चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी

Bhagyashree jadhav : जागतिक फाजा चॅम्पिअनशीप स्पर्धेत भाग्यश्री जाधव ठरली दोन सुवर्ण पदकांची मानकरी

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांनी नुकत्याच दुबई येथे झालेल्या जागतिक फाजा चॅम्पिअनशीप-२०२६ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून दोन सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवाशी असलेली आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत स्वतःचे आगळे वेगळेस्थान निर्माण केलेले आहे. सन २०१७ पासून त्यांची क्रीडा कारर्किर्द सुरू झाली. ९ वर्षांच्या काळात त्यांनी आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत त्या २३ सुवर्ण,४ रौप्य व ७ कास्य पदकांवर आपले नाव कोरले आहे. एकूण ३४ पदकांची त्यांनी कमाई केली. आजपर्यंत त्यांनी १० देशांमध्ये झालेल्या आंतराष्ट्रीय व जागतिक पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलेला आहे. सन २...
error: Content is protected !!