Bhadanta Payyabodhi Thero : धम्मचळवळीचे नवे दायाद – भदंत पंय्याबोधी थेरो
आंबेडकरी चळवळीने जातिधर्म, विषमता, वर्गवर्ण, कोणताही भेदभाव नसणारी माणसा माणसांत माणुसकी, बंधुत्वाची, मानवी स्वातंत्र्याची, न्यायप्रियतेची, समतेची कारुण्यदृष्टी पेरणारी, सर्वमानवसमभावी समाजरचना निर्माण व्हावी यासाठी अविरत संघर्ष केला आहे. हा संघर्ष संपलेला नाही, तो सुरुच आहे. हा संघर्ष खऱ्या अर्थाने आजच्या काळात भारतीय धम्मचळवळीने शिरी स्विकारला आहे. समाजाची धम्मधिष्ठीत पुनर्रचना व्हावी यासाठी ही चळवळ जनमानसात रुजत आहे. हीच क्रांतिकारी पुनर्रचनेचीच चळवळ आहे. नांदेड जिल्ह्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अखिल भारतीय भिख्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धर्मगुरु संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो (New Dayad of Dhamma Movement - Bhadanta Payyabodhi Thero ) यांनी धम्मचळवळीने दिलेला आणि आंबेडकरी चळवळीने स्वीकारलेला हा संघर्ष आपल्या हाती घेतला आहे. भदंत पंय्याबोधी थे...

