Sunday, June 28

Tag: Baba gave the mantra

Karma Yogi : अभावावर प्रेम करा हा मंत्र बाबांनी दिला- कर्मयोगी प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन

Karma Yogi : अभावावर प्रेम करा हा मंत्र बाबांनी दिला- कर्मयोगी प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| स्वर्गीय बाबा आमटे हे माझे जन्मदाते असले तरी निराधारांसाठी ते परमेश्वरच होते. निःस्पृह व सेवाभावी वृत्तीने त्यांनी कुष्ठरोग्यांचा योगक्षेम चालवला व त्यांना सन्मानाने आनंदवनात उभे केले आणि सगळ्या विश्वाचे लक्ष आनंदवनाकडे केंद्रित झाले, मुळातच संवेदनशील वृत्तीच्या बाबांनी रंजल्या गांजल्यांमध्ये परमेश्वर पाहिला आणि अभावावर प्रेम करा हा मंत्र बाबांनी दिला, असे प्रतिपादन पद्मश्री प्रकाश आमटे यांनी केले. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात पार पडलेल्या पाचव्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकीय भाषणात ते बोलत होते. विशेष म्हणजे लोक बिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेनंतर तेथे पार पाडणारे हे पहिलेच साहित्य संमेलन होते. नागपूरच्या बालाजी साहित्य संघाने हे संमेलन आयोजित केले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष बापू दासरी आणि विशेष अतिथी देवीदास फुलारी यांचे हस्ते प्रकाश आमटे व सौ. म...
error: Content is protected !!