Dnyaneshwar Maharaj Jayanti : संत ज्ञानेश्वर महाराज जयंती सोहळ्यातील कलावंतांना पं.स.कडून प्रमाणपत्र वाटप
हिमायतनगर| महाराष्ट्र शासनाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंती पालखी सोहळा दिंडी कार्येक्रम सण२०२५ हिमायतनगर पंचायत समिती कडून आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात तालुक्यातील कलावंतांनी सहभागी होऊन टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली या दिंडीत सहभागी असणाऱ्या सर्व कलावंतांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी शासनाच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहेत.
हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750 व्या जयंती निमित्त दि. १५ ऑगस्त रोजी दिंडी कारेक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोळ्यात तालुक्यातील कलावंतांच्या उपस्थिती मध्ये पंचायत समिती कार्यालयात स्वातंत्र्य दिनी दिवसभऱ संत ज्ञानेश्वर महाराजांचा गजर करीत भारूड भजन ;अभंग गायन सादर करण्यात आली व टाळ'मुदृंगा च्या गजरात दिंडी काढण्यात आली ...
