children’s drama competition : नांदेड येथे सुरु झालेल्या बालनाट्य स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन
नांदेड| राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा (children's drama competition) नांदेड केंद्राच्या स्पर्धा 27 जानेवारी २०२५ पासून सुरुवात झाल्या. या स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यात 10 वेगवेगळया केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. बाल नाट्य स्पर्धेचे उदघाटन लेखक तथा रंगकार्मी सुहास देशपांडे, परीक्षक सौ. प्राची उदय गोडबोले, श्री. विश्वास साहेबराव दुमाने, श्री.नरेंद्र ज्ञानदेव आंगणे, बाल नाट्य स्पर्धा विजेती बालकलाकार अक्षरा डोंगरगावकर आणि बाल नाट्य स्पर्धेचे समन्वयक किरण चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कुसुम नाट्यगृह, नांदेड येथे संपन्न होणाऱ्या एकूण 17 नाट्य...
