Apply to the Group Development Officer | समाज कल्याण विभागाच्या सेस फंडातील योजनांसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करा – NNL
नांदेड| मागास वर्गीयांना सामाजिक आर्थिक विकासासाठी असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड उपकर 20 टक्के सेस मागासवर्गीय कल्याण निधी 2024-25 अंतर्गत नऊ योजनांबाबतचे अर्ज 10 ऑगस्टपर्यत मागविण्यात आले आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी अटी व शर्तीच्या अनुषंगाने परिपूर्ण अर्जाचा प्रस्ताव संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यात 10 ऑगस्टपर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केला आहे.
या योजनांमध्ये मागासवर्गीय झेरॉक्स, (प्रिंटर, स्कॅनर व झेरॉक्स मशिन) वाटप करणे, मागासवर्गीय प्रशिक्षित महिलांना शिलाई मशीन पुरविणे, मागासवर्गीय विद्यार्थी/विद्यार्थीनींना सायकल पुरविणे, मागासवर्गीय मिरची कांडप पुरविणे योजना, मागास- वर्गीयांना...
