Ambadi Grampanchayat Lock Down ; मासिकसभा सुरु असताना सरपंचबाईचे पलायन… संतापलेल्या ग्रामस्थांनी अंबाडी ग्रा.प. कार्यालयाला ठोकले टाळे
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील मौजे अंबाडी येथे दि 28 मार्च 2025 रोजी ग्रामपंचायतची मासिक सभा सुरू असताना सदस्यांनी हिशोबाची मागणी करताच सरपंचबाईने अभिलेखे हातात घेऊन सभात्याग केल्याने संतापलेल्या गावकऱ्यांनी 29 मार्च रोजी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कारभारावर रोष व्यक्त करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले असून जोपर्यंत गटविकास अधिकाऱ्याकडून चौकशी होणार नाही तोपर्यंत टाळे खुलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थानी घेतला आहे. यावर आता गटविकास अधिकारी काय कारवाई करतात याकडे अंबाडीवाशीयांचे लक्ष लागून आहे.
किनवट तालुक्यातील अंबाडी ग्रामपंचायतचा कारभार या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान दि 28 मार्च 2025 रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ शितल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभेचे आयोजन केले होते. फोरम पूर्ण असल्याने सभा सुरू झाल्यानंतर उपसरपंच व सदस्यांनी माग...
