Amit Zawar : नांदेडचा अमित झंवर अंटार्क्टिकावर मॅरेथॉन पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय
नांदेड | सन 2024 मध्ये प्रतिष्ठित आयर्नमॅन 70.3 आणि एप्रिल 2025 मध्ये जागतिक मॅरेथॉन मेजर्स चॅलेंज यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर, नांदेडचे सुपुत्र अमित गोपाल झंवर यांनी आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करत अंटार्क्टिका या सातव्या खंडावर पूर्ण मॅरेथॉन पूर्ण करणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत. विशेष म्हणजे, या अत्यंत दुर्मिळ आणि खडतर मोहिमेत भारतामधून केवळ तीन जणांनी सहभाग घेतला होता.
खेळाची आवड आणि साहसाची ओढ जपत अमित गोपाल झंवर यांनी एप्रिल 2025 मध्ये जागतिक मॅरेथॉन मेजर पूर्ण केल्यानंतर, आपले पुढील आव्हान म्हणून पृथ्वीवरील सर्वात दुर्गम आणि प्रतिकूल ठिकाण असलेल्या अंटार्क्टिकाचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
अंटार्क्टिकातील कठीण परिस्थिती
या महिन्यात अमित झंवर यांनी अंटार्क्टिकामध्ये पाच दिवसांचा मुक्काम केला. या काळात तापमान -20 अंश सेल्सियसपर्यंत घसरले, तर ध्रुवीय वाऱ्यांमुळे -30 अंश ...
