Nagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : युती की स्वतंत्र लढत ?
हिमायतनगर (अनिल मादसवार) राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद निवडणुका जाहीर करताच हिमायतनगर शहरातील राजकीय तापमान झपाट्याने वाढले आहे. सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारीसाठी धाव घेत असून, प्रत्येक जण आपले वर्चस्व दाखवून “स्वबळाचा नारा” देत आहे. त्यामुळे या निवडणुकीत युती टिकणार की सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील लोकसभा व विधानसभा निवडणुका महायुती व महाआघाडीच्या पद्धतीने झाल्या असल्या, तरी हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक मात्र त्या धर्तीवर होईल असे सध्या तरी दिसत नाही. वरिष्ठ पातळीवर महायुतीकडून एकत्र लढण्याचा निर्णय झाला तरी स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे वेगळी असल्याचे चित्र आहे. हिमायतनगर नगरपंचायतीवर सुरुवातीची अडीच वर्षे काँग्रेस पक्षाची सत्ता होती.
मात्र, काही बंडखोर नगरसेवकांच्या विरोधामुळे पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष प...
