Rajesh Kumar ; महाराष्ट्राच्या प्रशासनाला विश्वासार्ह चेहरा देण्याचे काम महसूलचे – अपर मुख्य सचिव राजेश कुमार
नांदेड। कोणत्याही राज्याची, जिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरते. राज्याचे प्रशासन कसे आहे हे महसूल कर्मचाऱ्यांच्या परिश्रम, वृत्ती व सचोटीवर ठरते. महसूल कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे व दर्जेदार कामांमुळे देशात महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी आज येथे केले. महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे शानदार राजवैभवी उद्घाटन नांदेडमध्ये करण्यात आले. ध्वजारोहण माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
महसूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 21 ते 23 फेब्रुवारी नांदेडमध्ये संपन्न होत आहेत. आज श्री. गुरूगोविंद सिंघजी स्टेडियम येथे शुभारंभ झाला. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापूरकर,...
