Knife a thrilling robbery : चाकूचा धाक, कारमधून थरारक चोरी! ग्रामस्थांत दहशत
हिमायतनगर/नांदेड| हिमायतनगर तालुक्यातील सवना ज गावात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. चाकूचा धाक दाखवून चारचाकी कारमधून गरोदर शेळी पळवून नेण्यात चोरटे यशस्वी ठरल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना दि. २० जानेवारी रोजी रात्री सुमारे १२.१५ वाजता घडली.
सवना ज येथील रहिवासी, काबाडकष्ट करणारे अल्पभूधारक शेतकरी नामदेव नारायण अनगुलवार हे अनेक वर्षांपासून जोडधंदा म्हणून शेळीपालन करत आहेत. नेहमीप्रमाणे ते आपल्या घरासमोर बाजावर बसून शेळीवर लक्ष ठेवून असताना अचानक एक चारचाकी कार घटनास्थळी येऊन थांबली. कारमधून उतरलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी थेट चाकूचा धाक दाखवत अनगुलवार यांना धमकावले.
चोरट्यांनी त्यांच्या मालकीची गरोदर, सुमारे २० हजार रुपये किमतीची, तीन पिलांची आई शेळी दोरी कापून जबरदस्तीने कारमध्ये टाकली आणि क्षणात घटनास्थळावरून फरार झाले. अनगुल...
