Pragya Jagruti Mission ; गवळी समाजाच्या तेजस्वी भविष्यासाठी एक पाऊल – प्रज्ञा जागृती मिशन तर्फे १०० विद्यार्थ्यांचा सत्कार
नांदेड l समाजाच्या बौद्धिक समृद्धीचा उत्सव साजरा करताना नव्या पिढीच्या प्रज्ञेचा गौरव हा सगळ्यांच्याच मनाला आनंद देणारा क्षण असतो,प्रज्ञा जागृती मिशनच्या वतीने सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता, मारवाडी धर्मशाळा, साथी बालाराम यादव नगर, वझीराबाद, नांदेड येथे गवळी समाजातील सुमारे १०० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभात नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अभिनाश कुमार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. सामाजिक शिस्त, सकारात्मक बदल आणि प्रभावी प्रशासन यांचा समतोल राखत त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या प्रगतीस मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजातील युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे.
तसेच या कार्यक्रमात आणखी एक मान्यवर व्यक्तीमत्व मार्गदर्शनासाठी लाभत आहे दिक्षा अॅकेडमीचे संस्थापक लक्ष्मीशंकर यादव सर. शैक्षणिक क्षेत्...
