Tamsa ; अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या वतीने तामसा अत्याचार प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन
नांदेड l तामसा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने दहावीत शिकणाऱ्या आदिवासी मुलीवर बलात्कार केला आहे. सालगडी म्हणून शेतावर काम करणाऱ्या अशिक्षित आई वडिलांचा विश्वास संपदान करून अल्पवयीन मुलीस पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला आहे.
ब्लॅकमेल करण्यासाठी त्या नाराधमाने अत्याचार करतानाचे विडिओ मोबाईल द्वारे चित्रित केले आहेत. ही निंदनीय घटना घडल्या नंतर समाजातील सर्वच स्तरात राज्यभर संतापाची लाट पसरली आहे.
त्या नराधमास आणि त्याला सहकार्य करणाऱ्या इतरांना तसेच गर्भपात करणाऱ्या डॉक्टर व शिक्षण संस्थेच्या संचालकावर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीचे निवेदन दि.१४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील जिल्हाधिकारी यांचे मार्फत देण्यात आली आहे. निवेदनावर जमसं ज...
