Thursday, May 21

Tag: A shocking incident

Farmar Suffered Losses : बिलोली तालुक्यात शेतातील निवारा जाळण्याची धक्कादायक घटना; शेतकऱ्याचे सुमारे ३ लाखांचे नुकसान

Farmar Suffered Losses : बिलोली तालुक्यात शेतातील निवारा जाळण्याची धक्कादायक घटना; शेतकऱ्याचे सुमारे ३ लाखांचे नुकसान

नांदेड, लाइफस्टाइल
बिलोली, गोविंद मुंडकर | बिलोली तालुक्यातील गागलेगाव शिवारात अज्ञात व्यक्तींनी शेतातील पत्र्याचा निवारा जाळल्याची गंभीर घटना घडली असून, या आगीत एका शेतकऱ्याचे सुमारे ३ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गागलेगाव (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील रहिवासी बालाजी लक्ष्मण आरकटवाड यांच्या शिवारातील गट क्रमांक ११० मध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडला दि. ११ जानेवारी २०२६ रोजी अज्ञात कारणाने आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की काही वेळातच संपूर्ण निवारा जळून खाक झाला. या आगीत शेतकामासाठी अत्यावश्यक असलेले साहित्य पूर्णपणे नष्ट झाले आहे. यामध्ये जैन कंपनीचे तुपार संच – २, ठिबक सिंचन पाइप (२ एकर), पाण्याची टाकी, वायरचे २० बंडल, ज्वारी – १ क्विंटल, लसूण व कांदे – २ क्विंटल, कोंबडे – ५, पंप, स्प्रे मशीन, चार...
error: Content is protected !!