People’s leader Vilasrao Deshmukh : लोकनेते विलासराव देशमुख: विकासाची दूरदृष्टी असलेले दिलखुलास व्यक्तिमत्व, एक निष्ठावंत राजकारणी
महाराष्ट्राच्या राजकारणात दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे लोकनेते विलासराव देशमुख हे एक असे नेते होते, ज्यांनी सरपंचपदापासून ते राज्याच्या सर्वोच्च मुख्यमंत्रीपदापर्यंत तसेच केंद्रीयमंत्रीपदा पर्यंत प्रवास केला. त्यांच्या दिलखुलास स्वभावाने त्यांनी केवळ मित्रच नव्हे, तर राजकीय विरोधकांनाही आपलेसे केले. हा त्यांचा गुण संसदीय लोकशाहीची ऊंची वाढवणारा आहे, त्यांच्या वक्तृत्वाची, भाषणाची खास शैली आणि शब्दांवरील पकड आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या १३ व्या स्मृतिदीनानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आणि त्यांचे विचारकार्य पूढे घेऊन जाणे हीच खरी त्यांना आंदराजली ठरेल.
आदरणीय विलासराव देशमुख यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात १९७४ मध्ये बाभळगावच्या सरपंच पदापासून झाली. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्य अशी विविध पदे भ...
