Wednesday, May 13

Tag: A grand procession

Mahashivratri : वानवाडी (हरडफ) येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात

Mahashivratri : वानवाडी (हरडफ) येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात

धार्मिक, नांदेड
हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव तालुक्यातील हरडफ शिवारात पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या नैसर्गिक रम्य परिसरातील वानवाडी महादेव मंदिर (हरडफ) येथे महाशिवरात्रीनिमित्त १४ फेब्रुवारीपासून भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. यात्रेदरम्यान दररोज सकाळ व संध्याकाळ भजन, कीर्तन, पूजा-अर्चा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. हे पुरातन महादेव मंदिर ऐतिहासिक वारसा लाभलेले असून पूर्वी हरडफ शिवारात वसलेले वानवाडी गाव कालांतराने स्थलांतरित झाले आहे. विशेषतः लिंगायत समाजातील अनेक कुटुंबे इतरत्र स्थायिक झाली असली, तरी आपल्या जन्मभूमीशी असलेली नाळ जपण्यासाठी दरवर्षी या यात्रेला ते आवर्जून उपस्थित राहतात. हरडफ–धोत्रा मार्गावर चार गावांच्या सीमेवर वसल...
Himayatnagar : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरात पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचं भव्य पथसंचलन

Himayatnagar : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरात पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचं भव्य पथसंचलन

नांदेड, क्राईम, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३० रोजी शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचं पथसंचलन करण्यात आले. पथसंचलनादरम्यान पोलिसांच्या तैनातीमुळे शहरात दिमाखदार वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत, शांततापूर्ण आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्याचा संदेश दिला. निवडणूक काळात कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य, दहशत, दंगा किंवा बेकायदेशीर कृत्य सहन केले जाणार नाही, असे सूचक आवाहन या पथसंचलनातून करण्यात आले. मतदारांनी निर्भयपणे व शांततेत मतदान करावे, अशी विनंती पोलीस प्रशासनाच्या वतीने केली गेली. शहरात वाढविण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे गैरप्रकार करण्याचा विचार करणाऱ्यांम...
error: Content is protected !!