A golden opportunity through friendship for entrepreneurs in Nanded district | नांदेड जिल्हयातील उद्योजकांसाठी मैत्रीच्या माध्यमातून सुवर्णसंधी – NNL
नांदेड| उद्योग संचालनालयातंर्गत जिल्हा उद्योग केंद्र, नांदेड, सिडबी व मैत्री तर्फे नांदेड जिल्हयातील उद्योजकांसाठी, उद्योग क्षेत्रातील कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, जिल्ह्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक स्वरुपात वाढवून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्याप्रमाणात निर्माण करण्यासाठी, उद्योगाच्या विकासाकरिता शासनाच्या विविध योजनांच्या माहितीसाठी आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे अध्यक्षतेखाली, उद्योग भवन, कार्यालय जिल्हा उद्योग केंद्र, शिवाजीनगर, नांदेड येथे कार्यशाळा संपन्न झाली.
मान्यवरांना एक जिल्हा एक उत्पादनातंर्गत उत्पादित वस्तूंचे सस्नेह भेट सुपुर्द करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये उद्योगाशी संबंधीत विविध कार्यालयाचे तसेच महामंडळाचे पदाधिकारी, अग्रणी बँक अधिकारी उपस्थित होते. जिल्हयातील औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी, नामांकित उद्योजक, औद्योगिक समूह, सनदी लेखापाल व होतकरु उद्योजक ...
