Friday, June 26

Tag: 350th Martyrdom Ceremony

Endoscopy Examination : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमात भाविकांची मोफत एण्डोस्कोपी तपासणी

Endoscopy Examination : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमात भाविकांची मोफत एण्डोस्कोपी तपासणी

आरोग्य, नांदेड
नांदेड| “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी गॅलक्सी हेल्थ केअर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत एण्डोस्कोपी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले व एकमेव फिरते एण्डोस्कोपी रुग्णालय असलेल्या गॅलक्सी हेल्थ केअर चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सलग दोन दिवस हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या कालावधीत भाविकांची मोफत तपासणी व आवश्यक उपचार करून सेवाभावाची प्रचिती देण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना डॉ. नितीन जोशी यांनी सेवाभावी दृष्टीकोनातून राबवली असून, ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात येऊन महागड्या तपासण्या करणे शक्य नसल्याने गरजू रुग्णांपर्यंत थेट आरोग्यसेवा पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. गॅलक्सी हेल्थ केअर चॅरिटेबल ट्रस्टची...
error: Content is protected !!