Collecter Rahul kardile : जिल्हाधिकांऱ्याच्या संकल्पनेतून मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात साकारणार 1 लाख जलतारा
नांदेड l जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे संकल्पनेतुन नांदेड जिल्ह्यात मनरेगा योजनेंतर्गत एक लक्ष जलतारा पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यातील 16 तालुक्यात याबाबतची जनजागृती करण्या्साठी ग्रामपातळीपर्यंत सर्वांना मागील आठवडयात प्रशिक्षीत करण्यात आलेले आहे.
याचाच पुढील टप्पा म्हणून आज 21 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण 16 तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी जलतारा कामाचा #शुभारंभ करण्याात आला आहे.
जिल्ह्यातील 16 तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये आज अधिकाऱ्यांच्या हस्ते जलतारा कामांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते भोकर तालुकातील ग्रामपंचायतीमध्ये तर उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या हस्ते लोहा व कंधार तालुकातील ग्र...
