नांदेड। भारतीय स्टेट बँक क्षेत्रिय कार्यालय नांदेड यांचेवतीने प्रगतीशील शेतकरी मेळावा दि 21.06.2024 रोजी शहरातील नामांकित विसावा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यास शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.


सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन श्री भाऊसाहेब बारहाटे, जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड यांचे हस्ते करण्यात आले, ह्यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय स्टेट बॅंकेचे उपमहाप्रबंधक श्री. प्रियकुमार सरिगला , मुख्य अतिथी श्री दिलीप दमयावार , जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड यांचेसह भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रिय प्रबंधक श्री पक्काला कालीदासु, डाॅ समीर बिलोलीकर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.


आपले उद्घाटनपर विचार मांडताना जिल्हा कृषी अधीक्षकांनी शेतकर्यांना विविध शासकीय योजनांची माहीती दिली. तर अध्यक्षीय भाषणात श्री सरीगला यांनी कृषी दिर्घमुदत कर्जविषयक मार्गदर्शन केले तसेच शेतकर्यांना कृषी कर्ज वाटपातील बँकेची भुमिका सांगितली.

एका विशेष सत्रात स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक श्री शशिकांत फरकडे यांनी बॅंकेच्या विविध योजनांविषयी इत्थंभूत माहीती दिली तर श्री किरण चांदोरकर व डाॅ अश्विन राऊत ह्या अधिकार्यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांचे शंकानिरसन केले. श्री दिलीप दमयावार जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड , डाॅ समीर बिलोलीकर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तसेच सगरोळी येथील डाॅ व्यंकट शिंदे यांची समयोचित मार्गदर्शनपर भाषणे झाली.

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शिल्पा जिंतुरकर यांनी केले तर आभार भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रिय प्रबंधक श्री पक्काला कालीदासु यांनी व्यक्त केले.