हिमायतनगर, दत्ता शिराणे| लोकसभा निवडणूकी नंतर आता विधान सभा निवडणुकीची चर्चा होत असून, लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले बाबुराव कदम कोहळीकर हे विधान सभेच्या निवडणूकीत उतरणार हे आता जवळपास फिक्स असल्याने आमदार माधवराव पाटील जवळगावकर व कोहळीकर यांच्यातच सत्ता संघर्ष झालेला पहावयास मिळणार असून, ऑक्टोबर मध्ये विधान सभेच्या निवडणूका होणार असल्याने आतापासूनच या निवडणूकीची जोरदार चर्चा होत आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणूका काँग्रेस राष्ट्र वादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडी व तसेच भाजप शिवसेना शिंदे गट, राष्ट्र वादी अजित पवार गट व इतर मित्र पक्ष महायुतीकडून एकत्र लढल्या गेल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत गेल्याने महाराष्ट्रात आघाडीला सुगीचे दिवस पहावयास मिळाले असून, महायुतीला उतरती कळा लागली असल्याचे चित्र राज्यात पहावयास मिळाले. लोकसभे प्रमाणे विधान सभेच्या निवडणूकीत काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर मित्र पक्ष महाविकास आघाडी व तसेच भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट व अजित पवार राष्ट्र वादी गट अशी महायुती करून निवडणूका होणार का? हे आताच सांगणे संयुक्तिक ठरणार नाही.
परंतू लोक सभेच्या निवडणूकीत मिळालेले यश महाविकास आघाडी हे पुढे ही या प्रमाणेच कायम ठेवण्याच्या भुमिकेत असल्याचे आघाडीच्या कार्यकर्त्यांतून बोलल्या जात आहे. आणी तसे झाल्यास महाविकास आघाडीकडून काँग्रेस चे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर व तसेच हिंगोलीत पराभूत झालेले बाबुराव कदम कोहळीकर हे महायुतीकडून निवडणुकीला सामोरे जाणार हे आता जवळपास निश्चितच असल्याने आमदार माधवराव पाटील जवळगावकर व शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्यातच प्रमूख लढत होईल. अशी चर्चा आता हदगाव हिमायतनगर मध्ये जोरदार पणे होतांना दिसत आहे.
बाबुराव कदम कोहळीकर हे गेल्या विधान सभा निवडणूकीत शिवसेनेने तिकीट नाकारल्याचा राग मनात धरून जनभावना लक्षात घेवून अपक्ष उमेदवार म्हणून कोहळीकर हे विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले. आणी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत दोन्ही आजी माजी आमदाराला सळो की पळो करून सोडत दुसर्या क्रमांकाची मते घेवून अल्पशा मतांनी पराभूत झाले होते. कदमांची लोक सभेची तयारी मुळी नव्हतीच, परंतू राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा आदेश शिरसावंद्य मानून ते हिंगोली लोकसभेत लढले. परंतू त्यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीकडून लढलेले नागेश पाटील आष्टीकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. आता हदगाव हिमायतनगर विधान सभेतून नागेश पाटील आष्टीकर यांच्या रूपाने एक मोठा नेता लोकसभेवर गेला असल्याने जवळगावकर व कोहळीकर हेच दोन नेते एकमेकासमोर अवाहन उभे करणार असून आतापासूनच पुढच्या निवडणूकीची जोरदार चर्चा होत आहे.