HomeनांदेडA funeral going through waist-deep water; There is no road to the...

A funeral going through waist-deep water; There is no road to the cemetery | नदीपात्रात कंबरे इतक्या पाण्यातून जात अंत्यसंस्कार; स्मशानभूमीसाठी रस्ताही नाही..पूल नाही -NNL

लोहा| धानोरा मक्ता या ग्रामपंचायत अंतर्गत गांधीनगर, व ठाकरू तांडा या दोन वस्ती येतात .पण धानोरा येथे येताना आडवी नदी आहे.नदी पल्याड मुस्लिम बांधवांचे कबरस्थान आहे. गावातील ८५ वर्षीय व्यक्तीचे निधन झाले. वरून पावसाची रिपरिप ते नदी पात्रात कंबरे इतके पाणी त्यातून वाट काढत जनाजा कब्रस्तान मध्ये मोठ्या अडचणीतून रस्ता काढत पोहचला. आणि शेख इमाम शेख नबी यांच्यावर दफनविधी करण्यात आले. अनेक वर्षा पासून पुलाची मागणी करण्यात येत आहे पण ती अद्याप पूर्ण झाली नाही.”कर्तव्यदक्ष “,असलेल्याना लोकप्रिय कामे करता आली नाहीत संतप्त नातेवाईकांनी व्यक्त केला.

लोहा तालुक्यात धानोरा मक्ता या ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गांधी नगर व ठाकरू तांडा या दोन वस्ती चाळीस-पन्नास उंबरठय़ाच्या आहेत. यावस्ती व धानोरा या गावच्या मधून नदी वाहते. पावसाळा आला की, या गावचा संपर्क तुटतो.मागील तीन चार दिवसा पासून तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे धानोरा नदीला पाणी आले नदी पल्याड असलेल्या वस्तीचा संपर्क तुटला. मागील वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने गांधीनगर वस्तीवाल्यानी नदी पात्रात स्वातंत्र्य दिनी आंदोलन केले होते .पण अजूनही निद्रिस्त प्रशासनाला जाग आली नाही.

IMG 20240727 WA0042 A funeral going through waist-deep water; There is no road to the cemetery | नदीपात्रात कंबरे इतक्या पाण्यातून जात अंत्यसंस्कार; स्मशानभूमीसाठी रस्ताही नाही..पूल नाही -NNL

तत्कालीन अभियंता दाडगे यांनी पूल मंजूर करून आणला होता पण पुढे त्यावरून श्रेयवाद रंगला आणि पावसाळा संपला की या वस्ती वाल्याचा त्रास संपला असे प्रशासनाला लोप्रतिनिधी याना वाटते. पावसाळ्यात वानराचे घर बांधण्याच्या गोष्टी सारखी कथा या गावाची झाली आहे रस्त्याची मागणी करून कोणत्याही लोकप्रतिनिधीने ती पूर्ण केली नाही त्यामुळे येथील लोकांना अंत्यविधीसाठी पाण्यातून रस्ता काढून अंत्यविधी करावा लागत आहे.

गांधीनगर वस्तीला जाण्यासाठी नदीवर पूल नाहीं अनेक वर्षापासूनवस्तीला जाण्यासाठी रस्ता नाही. अनेक वेळा लेखी निवेदने दिली आंदोलने केली पण लोकप्रतिनिधी प्रशासनास यांची उदासीनता दिसून आली. २६ जुलै रोजी गांधीनगर येथील वृद्ध व शेख इमाम शेख नबी (वय 85 वर्ष) यांचे निधन झाले त्याचा जनाजा (अंत्यसंस्कारासाठी कब्रस्तानकडे निघाला नदी पात्रातून कंबरेइतक्या पाण्यातून वाट काढत त्या वृद्धावर दफनविधी करण्यात आला. कर्तव्यदक्ष असलेल्या लोकप्रतिनिधी याना पूल बांधण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे येथील रहिवाशांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी विषयी संताप व्यक्त केला तहसीलदार परळीकर यांच्या पहिल्या टर्म मध्ये रस्ता झाला होता. आता पुन्हा तेच तहसीलदार आहेत त्यांच्या काळ “पूल “होईल काय (?) असे गावकऱ्यांना वाटते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments