अवैध सावकारीविरोधात सहकार विभागाची धडक कारवाई

नांदेड तालुक्यातील संशयित सावकाराच्या घर व दुकानावर झडती; हिशेब वह्या व दस्तऐवज ताब्यात

NNL Team
By NNL Team

नांदेड, प्रतिनिधी| नांदेड तालुक्यातील वाडी पुयड येथील विनापरवाना अवैध सावकारी व्यवहारासंबंधी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 च्या कलम 16 अंतर्गत संबंधित व्यक्तीच्या राहत्या घरावर व दुकानावर झडतीची कारवाई केली. या कारवाईदरम्यान कथित अवैध सावकारी व्यवहारांशी संबंधित संशयित हिशेब वह्या व दस्तऐवजांच्या प्रती पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

गैरअर्जदार गजानन प्रभाकर कदम, रा. वाडी पुयड, ता. जि. नांदेड यांच्याविरुद्ध दाखल तक्रारीच्या अनुषंगाने दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी ही तपासणी करण्यात आली. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 च्या कलम 39 अन्वये गुन्हा क्रमांक 1391/2026 नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाची कायद्यानुसार पुढील चौकशी करण्यात येणार आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच लातूरचे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे आणि नांदेड येथील उपनिबंधक, सहकारी संस्था किशन फिसके यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली. या कारवाईसाठी नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी आवश्यक प्रशासकीय सहकार्य केले.

या पथकात सहकार अधिकारी श्रेणी-1 एम. आर. येवते व बी. बी. बोधगिरे, सहकार अधिकारी श्रेणी-2 जी. यू. कुटे व एस. एन. पटके, मुख्य लिपिक ए. वाय. दीक्षित, सहायक सहकार अधिकारी ए. ए. शिंदे व ए. व्ही. वडेपल्ली तसेच कनिष्ठ लिपिक एस. व्ही. करंजे यांचा समावेश होता. पोलिस विभागाचे संरक्षण आणि पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई पार पडली.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी विनापरवाना सावकारी व्यवहार करणाऱ्या व्यक्तींबाबतची माहिती सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा जिल्हा निबंधक (सावकारी), नांदेड कार्यालयाकडे किंवा संबंधित तालुक्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवून तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही सहकार विभागाने कळविले आहे.


Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!