ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी आता संघटित लढा! श्री परमेश्वर ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्षपदी महावीरचंद श्रीश्रीमाळ

कोजागिरी पौर्णिमेच्या शुभदिनी निवड जाहीर; ज्येष्ठांच्या समस्या, हक्क आणि सन्मानासाठी कार्य करण्याचा निर्धार

NNL Team
By NNL Team
Oplus_16908288

हिमायतनगर (वाढोणा), अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, त्यांच्या विविध समस्या सोडविणे आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, या उद्देशाने कार्यरत होत असलेल्या श्री परमेश्वर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, हिमायतनगरच्या अध्यक्षपदी श्री परमेश्वर मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांची निवड करण्यात आली आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभदिनी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने ही निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

१२ ऑक्टोबर रोजी श्री परमेश्वर मंदिर परिसरात श्री परमेश्वर ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची बैठक उत्साहात पार पडली होती. या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून अशोक तेरकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री परमेश्वर मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ आणि नागनाथ अक्कलवाड गुरुजी उपस्थित होते. यावेळी हिमायतनगर शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणून त्यांच्या अडीअडचणी, समस्या आणि न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीनंतर शहर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या कामात महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या सहभागाची दखल घेत ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

IMG 20261027 160558 scaled ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी आता संघटित लढा! श्री परमेश्वर ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्षपदी महावीरचंद श्रीश्रीमाळ
Oplus_16908288

ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना मिळणार संघटित व्यासपीठ!

वृद्धापकाळात आरोग्यविषयक अडचणी, शासकीय योजनांचा लाभ, निवृत्तिवेतन, मूलभूत सुविधा तसेच दैनंदिन जीवनातील विविध समस्यांना अनेक ज्येष्ठ नागरिकांना सामोरे जावे लागते. अशा वेळी त्यांच्या समस्या संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचविणे, त्यांना शासकीय योजनांची माहिती मिळवून देणे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी पाठपुरावा करणे, ही संघटनेसमोरील महत्त्वाची उद्दिष्टे असतील.

महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य शहरासह संपूर्ण तालुक्यात विस्तारावे आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांसाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा सन्मान राखत त्यांना सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि आधाराचे जीवन मिळवून देण्यासाठी संघटनेचे पुढील कार्य महत्त्वाचे ठरणार आहे.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!