चंद्राच्या शीतल चांदण्यात रंगली ‘स्वरझंकार’ची सुरेल मैफिल!

श्री परमेश्वर मंदिरात कोजागिरी पौर्णिमेचा भक्तिमय सोहळा; भावगीते आणि भक्तिगीतांनी रसिक मंत्रमुग्ध

NNL Team
By NNL Team
Oplus_19005440
हिमायतनगर (वाढोणा), अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात कोजागिरी पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी ॐकार संस्था, पुणे प्रस्तुत ‘स्वरझंकार’ भावभक्ती संगीताची विशेष मैफिल मोठ्या उत्साहात संपन्न झाली. चंद्राच्या शीतल चांदण्यात, सुरेल स्वरांच्या बरसातीत आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात मंदिर परिसर अक्षरशः भक्तिमय झाला. भक्तिगीते आणि भावस्पर्शी मराठी गीतांच्या सादरीकरणाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

‘माय माझी सरस्वती’, ‘शंभो शंकरा’, ‘येई बा विठ्ठले’, ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘माझी रेणुका माऊली’, ‘मन लागो रे’ अशा भक्तिरसपूर्ण गीतांसोबतच ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणि ती राणी’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात’, ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ आणि ‘सत्यम शिवम सुंदरम’ यांसारख्या लोकप्रिय गीतांनी मैफिलीला रंगत आणली. प्रत्येक गीताला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. श्री परमेश्वराच्या चरणी स्वरसेवा अर्पण करत कलाकारांनी संगीत आणि भक्तीचा अनोखा संगम घडवून आणला.

या मैफिलीत गायक परमेश्वर तिप्पनवार आणि माधुरीताई जाधव यांनी आपल्या सुरेल गायनाने रसिकांची मने जिंकली. प्राचार्य अंभोरे सर यांनी प्रभावी निवेदन केले. सुनील मांजरे व राजेश जाधव यांनी वाद्यवृंदाची साथ दिली, तर सचिन बोंपीलवार आणि कृष्णा बोंपीलवार यांनी पखवाज व तबल्याच्या तालाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

या संगीत सोहळ्याला श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अक्कलवाड सर, नगरसेवक डॉ. राजेंद्र वानखेडे, रामराव सूर्यवंशी, वऱ्हाडे सर, व्यंकटराव चवरे, लिंगारेड्डी तिप्पनवार, प्रभाकर मुधोळकर, सुभाष शिंदे, बाबुराव बंडेवार, ट्रस्टचे संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, वामनराव पाटील वडगावकर, नगरसेवक सुभाष बलपेलवाड, ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, पत्रकार अशोक आनगुलवार, व्यापारी बाळूअण्णा चवरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

IMG20261025214755 scaled चंद्राच्या शीतल चांदण्यात रंगली ‘स्वरझंकार’ची सुरेल मैफिल!
oplus_0

तसेच राजदत्त सूर्यवंशी, मारोती लुमदे, साहेबराव अष्टकर, अविनाश संगणवार, राज यशवंतकर, प्रवीण कोमावार, परमेश्वर शक्करगे, अनंता मुत्तलवाड, सूर्यवंशी सर, अनुअप्पा दमकोडवार, मारोती हेंद्रे, सतीश गोपतवाड, पंडित ढोणे यांच्यासह श्री परमेश्वर भजनी मंडळी, महिला-पुरुष भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या मैफिलीने वाढोण्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत आणखी एक सुरेल पर्व जोडले. भक्ती, संगीत आणि संस्कृतीचा संगम घडविणाऱ्या अशा उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा दृढ होण्यासोबतच नव्या पिढीला भारतीय संगीतपरंपरेची ओळख होते. या सुरेल सोहळ्याने उपस्थित भाविकांना आनंद आणि आध्यात्मिक समाधानाची अनुभूती दिली. ॐकार संस्था, पुणे आणि ‘स्वरझंकार’च्या कलाकारांनी सादर केलेल्या या बहारदार मैफिलीचे उपस्थितांनी कौतुक केले. कोजागिरीच्या चांदण्यात न्हाऊन निघालेला हा भक्तिसंगीत सोहळा रसिकांच्या स्मरणात राहणारा ठरला.

IMG20261025214729 scaled चंद्राच्या शीतल चांदण्यात रंगली ‘स्वरझंकार’ची सुरेल मैफिल!
oplus_0

कोजागिरीच्या चांदण्यात मसाला दुधाचा आस्वाद!

भावभक्ती गीत-संगीताच्या सुरेल मैफिलीनंतर रात्री बारा वाजता कोजागिरी पौर्णिमेच्या परंपरेनुसार चंद्राचे प्रतिबिंब दुधात पाहण्याचा आनंद घेत भाविकांना दुधाचे वितरण करण्यात आले. यावेळी शेकडो भाविकांनी चंद्राच्या शीतल चांदण्यात मसाला दुधाचा आस्वाद घेतला. भक्ती, संगीत आणि कोजागिरीच्या पारंपरिक उत्सवाचा आनंद द्विगुणित करणारा हा क्षण उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!