गोवर्धन भाऊ बियाणी यांची महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणीवर बिनविरोध निवड

दैनिक प्रजावाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

NNL Team
By NNL Team

नांदेड, अनिल मादसवार| दैनिक प्रजावाणीचे संपादक गोवर्धन भाऊ बियाणी यांची महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यपदी तसेच प्रदेश कार्य समिती सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकारिता आणि माहेश्वरी समाजाच्या सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे गोवर्धन भाऊ बियाणी यांना महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मिळाल्याने त्यांच्या कार्याचा गौरव झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यकौशल्याचा उपयोग समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या बिनविरोध निवडीबद्दल गोवर्धन भाऊ बियाणी यांचे पत्रकार बांधव, समाजबांधव आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!