क्राईमनांदेड

12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण मुलीची टी.सी. काढण्याकरीता 12 हजाराचं कुलर मागितल ; नायगाव तालुक्यातील संस्थाचालक मुख्याध्यापकावर गुन्हा -NNL

नांदेड। मुलीची 12 वी विज्ञान शाखेची टी.सी. काढण्यासाठी शाळेत जावून संस्थाचालक मनोहर पवार यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मुलीची टि.सी. देण्याकरीता 12,000/- रूपये किंमतीचे सिम्पनी कंपनीचे कुलरची मागणी केली. आणि तडजोडीअंती रूपये 3,000/- पंचासमक्ष मोबाईल फोनद्वारे लाचेची मागणी करून लाच रक्कम कॉलेजचे मुख्याध्यापक बहिनाजी वरवंटे, मुख्याध्यापक तथा प्राचार्य, मास्टर दिनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोमठाणा ता.नायगाव, जि.नांदेड यांच्याकडे देण्यास सांगितले. हा प्रकार लाच देण्यासारखे आसल्याचे लक्षात आल्याने त्यानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संस्थाचालक आणि मुख्याध्यापक तथा प्राचार्य, मास्टर दिनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोमठाणा ता.नायगाव, जि.नांदेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांची मुलगी ही मास्टर दिनानाथ मंगेशकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोमठाणा, ता.नायगाव येथून 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या मुलीची टी.सी. काढण्या करीता नमुद शाळेत जावून संस्थाचालक मनोहर पवार यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मुलीची टि.सी. देण्याकरीता 12,000/- रूपये किंमतीचे सिम्पनी कंपनीचे कुलरची मागणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी नाइलाजास्तव होकार दिला. ही वस्तूची मागणी लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने व त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे दि. 02/07/2024 रोजी याबाबत तक्रार दिली.

सदर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडकडून दि. 02/07/2024 रोजी लाच मागणीची पडताळणी केली असता, लाच मागणी पडताळणी दरम्यान यातील आरोपी मुख्याध्यापक तथा प्राचार्य लोकसेवक क्रमांक 2 बहिनाजी वरवंटे यांनी त्यांचे मोबाईल वरून आरोपी क्र. 1 मनोहर पवार यांना संपर्क केला. त्याच मोबाईल फोनवरून तक्रारदार हे आरोपी क्र. 1 मनोहर पवार यांना त्यांच्या मुलीची 12 वी उत्तीर्ण झाल्याची टि.सी. मिळणे संबंधाने बोलले असता त्यांनी तडजोडीअंती रूपये 3,000/- स्वतःचे फायदयाकरिता पंचासमक्ष मोबाईल फोनद्वारे लाचेची मागणी करून लाच रक्कम कॉलेजचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य वरवंटे यांचेकडे देण्याचे सांगून लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर तक्रारदार हे शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य बहिनाजी वरवंटे यांचेकडे त्यांच्या मुलीची टि.सी. संबंधाने बोलले असता त्यांनी आरोपी क्र. 1 मनोहर पवार यांच्या मागणी प्रमाणे लाच रक्कम घेवून या, असे म्हणून पंचासमक्ष रु. 3000/- लाच रक्कम देण्यास तक्रारदार यांना प्रोत्साहीत केले. म्हणून नमुद प्रकरणात दोघांवर पोलीस स्टेशन कुंटूर, ता.नायगाव, जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कार्यवाही डॉ.राजकुमार शिंदे, भापोसे पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र मो.क्र. 9623999944, पर्यवेक्षण अधिकारी श्री प्रशांत पवार, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड मो.क्र. 987014591, सापळा व तपास अधिकारी श्री प्रशांत पवार, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड, सापळा कारवाई पथक अँटी करप्शन ब्युरो, नांदेडची टीम यांनी केली.

नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केले की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा. दुरध्वनी 02462-253512 टोल फ्रि क्रं. 1064 असे आवाहन करण्यात आले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button