डॉ.शंकरराव चव्हाणामुळे मराठवाड्याची तहान भागली- आ. ॲड. श्रीजयाताई चव्हाण

NNL Team
By NNL Team

नांदेड/अर्धापूर| या वर्षी महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असून सर्वांनी पाणी अत्यंत जपून वापरणे गरजेचे आहे. दिवंगत नेते कै. शंकरराव चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीमुळे आणि इसापूर-जायकवाडी धरणासारख्या मोठ्या प्रकल्पामुळेच आज तहानलेल्या मराठवाड्याची तहान भागू शकली. असे गौरवउद्गार आ. ॲड. श्रीजयाताई चव्हाण यांनी पिंपळगाव महादेव येथे काढले.

​देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक सेवाकार्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात राबवल्या जात असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत नांदेड येथील जयप्रकाश ग्राम कल्याण संस्था संचलित ‘निर्धार व्यसनमुक्ती केंद्रा’च्या वतीने पिंपळगाव येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आमदार ॲड. श्रीजयाताई चव्हाण यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कु. राजनंदिनी दुधमल आणि महेश व्यंकटी कल्याणकर यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्वतःमधील कौशल्यांचा विकास करावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

IMG 20261025 WA0036 डॉ.शंकरराव चव्हाणामुळे मराठवाड्याची तहान भागली- आ. ॲड. श्रीजयाताई चव्हाण

​कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष राम अय्यर यांनी व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्याची माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाषराव कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास गावातील प्रतिष्ठित नागरिक सौ. सारिका कल्याणकर, प्रवीण देशमुख, सुरेश देशमुख, अजय कल्याणकार, वसंतराव कल्याणकर, नागोराव भांगे पाटील, बालाजी गव्हाणे, माधवराव कल्याणकर , मुख्याध्यापक इंगोले, अहंकारे सर यांच्यासह शिक्षकवृंद, पालक आणि हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG 20261025 WA0042 डॉ.शंकरराव चव्हाणामुळे मराठवाड्याची तहान भागली- आ. ॲड. श्रीजयाताई चव्हाण

​कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी ‘निर्धार व्यसनमुक्ती केंद्रा’स आ.श्रीजया चव्हाण यांनी सदिच्छा भेट देऊन चालवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन भगवान साळवे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकांत निळेकर, संकेत अय्यर, वंदना सावते, आनंदराव शिंदे, रामगिरवार आणि सचेतन अय्यर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!