Homeक्राईममाहूरमध्ये तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई; २३ जणांना दंडाचा दणका!

माहूरमध्ये तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई; २३ जणांना दंडाचा दणका!

कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ९ हजार ६०० रुपये वसूल; जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाची मोहीम

माहूर/नांदेड (प्रतिनिधी) माहूर शहर व परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने धडक मोहीम राबविली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २३ तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करून ९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या या मोहिमेमुळे तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

माहूर शहर व परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या आणि सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम, २००३ (कोटपा) कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर जिल्हास्तरीय पथकाने विविध ठिकाणी अचानक तपासणी करून नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनुपमा शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे आणि नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

FB IMG 1792034002726 माहूरमध्ये तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई; २३ जणांना दंडाचा दणका!

या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. संजीवनी जाधव, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, समुपदेशक किरण चिरडे आणि एमजीव्हीएसचे मंगेश गायकवाड सहभागी झाले होते. माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सत्यपाल मडावी आणि होमगार्ड शेख असलम यांनी मोहिमेस सहकार्य केले.

कायद्याचे उल्लंघन दिसल्यास तक्रार करा! तंबाखूजन्य पदार्थांच्या अनियंत्रित विक्रीवर आळा घालणे, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. सार्वजनिक ठिकाणे तसेच शैक्षणिक संस्था आणि शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसंबंधी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी जिल्हा रुग्णालय, नांदेड येथील जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे.

तंबाखूमुक्त नांदेड हे केवळ प्रशासनाचे नव्हे, तर संपूर्ण समाजाचे ध्येय असले पाहिजे. दंडात्मक कारवाईसोबतच नियमभंग करणाऱ्यांवर सातत्याने लक्ष ठेवणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तंबाखूमुक्त जिल्ह्याच्या अभियानात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments