Homeकृषीअनधिकृत पाणी उपशाविरोधात प्रशासनाची धडक कारवाई ५१ डेपोचे वीज कनेक्शन खंडित

अनधिकृत पाणी उपशाविरोधात प्रशासनाची धडक कारवाई ५१ डेपोचे वीज कनेक्शन खंडित

२१५ अनधिकृत मोटारींचे कनेक्शन तोडले महसूल-पोलीस विभागाची संयुक्त मोहीम; कारवाई पुढेही सुरू राहणार

नांदेड| नांदेड शहरासह गोदावरी नदीकाठावरील गावांना भविष्यात पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा आणि डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी जलाशयातील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित राहावा, यासाठी प्रशासनाने अनधिकृत पाणी उपशाविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार आणि तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाण्याचा अनधिकृत वापर आणि अपव्यय रोखण्यासाठी महसूल, पोलीस व संबंधित विभागांच्या संयुक्त पथकांनी विविध ठिकाणी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान रहाटी, जैतापूर, सोमेश्वर, पिंपळगाव को., बोरगाव ते., थुगाव, मार्कड, पिंपळगाव निमजी, कल्लाळ, विष्णुपुरी आणि कोटीतीर्थ येथील एकूण ५१ डेपोचे वीज कनेक्शन खंडित करण्यात आले.

याशिवाय विविध ठिकाणी जलाशयातून पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या २१५ अनधिकृत मोटारींचे कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे जलाशयातील अनधिकृत पाणी उपसा रोखण्यास मदत होणार असून उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी सुरक्षित ठेवण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.

FB IMG 1791214019270 अनधिकृत पाणी उपशाविरोधात प्रशासनाची धडक कारवाई ५१ डेपोचे वीज कनेक्शन खंडित

ही कारवाई महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत करण्यात आली. ए. बी. सिंगणवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमटे, एएसआय रामराव ढोले, मंडळ अधिकारी सय्यद मोहसिन, पोलीस उपनिरीक्षक रामराव केंद्रे तसेच एम. एफ. बागवान यांच्या पथकाने कारवाई केली. तसेच मंडळ अधिकारी मधुकर फुलवले, पोलीस उपनिरीक्षक गोविंद जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग घेतला.

नांदेड शहर तसेच गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर व्हावा, यासाठी अनधिकृत पाणी उपशाविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments