Homeकरियरजातीअंत संघर्ष समितीचे जिल्हा अधिवेशन संपन्न; कॉ.गंगाधर गायकवाड यांची जिल्हा निमंत्रकपदी एकमताने...

जातीअंत संघर्ष समितीचे जिल्हा अधिवेशन संपन्न; कॉ.गंगाधर गायकवाड यांची जिल्हा निमंत्रकपदी एकमताने निवड

नांदेड| जातीव्यवस्था, सामाजिक विषमता आणि जातीय भेदभावाविरोधात व्यापक जनजागृती व संघर्ष उभारण्याच्या निर्धाराने जातीअंत संघर्ष समितीचे नांदेड जिल्हा अधिवेशन शिवाजी नगर येथील हॉटेल विसावा येथे १४ सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाले.या अधिवेशनाचे उदघाटक डॉ.सचिन सरोदे तर स्वागताध्यक्ष डॉ. प्रा.राजेंद्र गोनारकर हे होते.

महाराष्ट्र राज्याचे प्रभारी कॉ.शैलेंद्र कांबळे (मुंबई), व राज्याचे निमंत्रक कॉ.बब्रुवहन पोटभरे आणि जनवादी चळवळीचे नेते कॉ.विजय गाभने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या अधिवेशनात दलित अत्याचारावर चर्चा करण्यात आली. अधिवेशनात समितीच्या नूतन जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून कॉ.गंगाधर गायकवाड यांची जिल्हा निमंत्रकपदी एकमताने निवड करण्यात आली.

अधिवेशनात जातीय अत्याचार, सामाजिक विषमता, भेदभाव, अंधश्रद्धा तसेच जातीव्यवस्थेच्या मुळावर प्रहार करण्यासाठी संघटितपणे संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी कॉ.गंगाधर गायकवाड (निमंत्रक), कॉ. जनार्धन काळे (कार्यकारी निमंत्रक) तर डॉ.प्रा.आदिनाथ इंगोले (सह निमंत्रक), व सदस्य म्हणून कॉ.विजय लोहबंदे, आडेलू बोनगीर, आनंद लव्हाळे, मेघाताई इंगोले, संगीता गाभने, माधव देशटवाड, प्रा.पंजाबराव शेरे, जयराज गायकवाड, उत्तम कोमवाड यांची जिल्हा कमिटी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. उर्वरित पाच जागा रिक्त ठेवण्यात आल्या.

यावेळी, अखिल भारतीय किसान सभेचे नेते कॉ.अर्जुन आडे, राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंचचे नेते कॉ.शंकर सिडाम, सीटू राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार, जमसं च्या राज्य सचिव मंडळ सदस्या व जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड,महाराष्ट्र राज्य शेत मजूर युनियनचे सह सचिव कॉ. विनोद गोविंवार, सीटू राज्य कमिटी सदस्या कॉ.करवंदा गायकवाड, एसएफआयच्या जिल्हा सचिव कॉ. मीना आरसे,डॉ.हेमंत कार्ले, ऍड. प्रशांत कोकणे,श्याम सरोदे, मंगेश वट्टेवाड, राहुल नरवाडे, कॉ. मारोती केंद्रे आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

IMG 20260915 WA0009 जातीअंत संघर्ष समितीचे जिल्हा अधिवेशन संपन्न; कॉ.गंगाधर गायकवाड यांची जिल्हा निमंत्रकपदी एकमताने निवड

नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात जातीअंताच्या चळवळीला अधिक व्यापक आणि संघटित स्वरूप देण्याचा निर्धार करण्यात आला.

“जातव्यवस्था नष्ट करा – समताधिष्ठित समाज निर्माण करा” या निर्धाराने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. कॉ.गंगाधर गायकवाड यांची निमंत्रकपदी झालेली निवड ही जातीअंताच्या चळवळीला नवी दिशा देणारी ठरणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments