Homeकरियरसंगुचीवाडीच्या दोन तरुणांची शिक्षकपदी निवड; गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

संगुचीवाडीच्या दोन तरुणांची शिक्षकपदी निवड; गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

माजी जि.प. सदस्य रामचंद्र येईलवाड यांच्या हस्ते सत्कार

कंधार, सचिन मोरे | महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलद्वारे राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत कंधार तालुक्यातील संगुचीवाडी येथील दोन तरुणांची शिक्षकपदी निवड झाली आहे. भास्कर सुभाष घुमे यांची जि.प. प्राथमिक शाळा, गडचिरोली येथे, तर विजय बाबुराव बीजे यांची जि.प. प्राथमिक शाळा, यवतमाळ येथे नियुक्ती झाली आहे. त्यांच्या यशामुळे संगुचीवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या जोरावर शिक्षकपदापर्यंत मजल मारलेल्या या दोन्ही तरुणांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे संगुचीवाडीच्या शैक्षणिक लौकिकात भर पडली असून, गावातील विद्यार्थ्यांसाठीही हे यश प्रेरणादायी ठरले आहे.

या यशाबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र येईलवाड यांच्या हस्ते भास्कर सुभाष घुमे आणि विजय बाबुराव बीजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दोन्ही तरुणांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी ज्ञानोबा माऊली वारकड, सुखदेव येईलवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही तरुणांनी मिळविलेल्या यशामुळे गावातील तरुणाईमध्येही शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments