Homeनांदेडनांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी जवळगावकरांचे नाव आघाडीवर; भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण

नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी जवळगावकरांचे नाव आघाडीवर; भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण

नांदेड | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ निवडणुकीनंतर अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा नवनिर्वाचित संचालक माधवराव पाटील जावळगावकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांनी वेग घेतला आहे.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अध्यक्षपदासाठी विविध स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकीय समीकरणे बदलत असल्याने जावळगावकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून जावळगावकर यांच्याशी संपर्क साधला जात असून, पक्षात प्रवेश झाल्यास अध्यक्षपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड आगामी काळात होणार असून, अंतिम निर्णयानंतरच राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. तोपर्यंत नांदेडच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments