HomeनांदेडShri Krishna Goshala : श्रीकृष्ण गोशाळेत ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन...

Shri Krishna Goshala : श्रीकृष्ण गोशाळेत ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ उत्साहात

लाल कंधारी गोवंश संवर्धन केंद्र कंधार येथे पूर्ववत सुरू करण्याची मागणी

नांदेड, प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाने २२ जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून घोषित केल्यानंतर श्रीकृष्ण गोशाळा, पोखरभोसी (ता. लोहा) येथे हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गोमातेचे पूजन व आरती करून गोशाळा परिसरात देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.

महाराष्ट्रात देशी गोवंशाचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी गोवंशाला विशेष स्थान मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खिल्लार, देवणी, लाल कंधारी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला, कठाणी यांसह देशातील विविध शुद्ध देशी गोवंशाच्या प्रजाती महाराष्ट्रात आढळतात.

लाल कंधारी गोवंशाची स्वतंत्र ओळख
नांदेड जिल्ह्यातील कंधार, लोहा, मुखेड व बिलोलीसह लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत लाल कंधारी प्रजातीचा गोवंश मोठ्या प्रमाणावर आढळतो. लाल रंगाचा, चपळ, कणखर आणि ऐटदार बांधा असलेला हा गोवंश शेतीच्या कामासाठी उपयुक्त असून, लाल कंधारी गायीचे दूधही उत्कृष्ट गुणवत्तेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

IMG 20260722 WA0053 Shri Krishna Goshala : श्रीकृष्ण गोशाळेत ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ उत्साहात

मात्र, लाल कंधारी गोवंशाच्या संवर्धनासाठी कंधार तालुक्यातील गऊळ येथे उभारण्यात आलेले संवर्धन केंद्र नंतर बीड जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे लाल कंधारी गोवंशाचे मूळ क्षेत्र असलेल्या कंधार येथेच हे संवर्धन केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

“आजही लाल कंधारी गोवंश हा या भागातील गोरगरिबांची कामधेनू आहे. अनेक कुटुंबांचे संसार गोसंगोपनावर चालतात. शासनाच्या योजनांमधून संकरित जनावरांऐवजी देशी प्रजातींच्या संगोपनाला प्राधान्य दिल्यास ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ साजरा करण्याचा खरा उद्देश साध्य होईल,” असे मत गोभक्त रामजीबाई भानुशाली गोरी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास कर्सनभाई पटेल, परबतभाई पटेल, श्याम डांगे, संजय पवार, भवानभाई पटेल, धीरजभाई पटेल, अंबालालभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. नांदेड व परिसरातील गोभक्त तसेच गुजराती महिला मंडळाच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी कडुनिंब, अर्जुन, करंज, आंबा, करवंद, पेरू आणि विविध फुलझाडांची लागवड करण्यात आली. लाल कंधारी गोवंशाच्या संवर्धनासाठी श्रीकृष्ण गोशाळेच्या वतीने जनजागृती व प्रचार-प्रसार करण्याचा तसेच शासनाच्या माध्यमातून स्वतंत्र लाल कंधारी संवर्धन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments