HomeनांदेडAgricultural Equipment : कृषी अवजार बँकेसाठी २४ लाखांपर्यंत अनुदान; अर्जाची अंतिम...

Agricultural Equipment : कृषी अवजार बँकेसाठी २४ लाखांपर्यंत अनुदान; अर्जाची अंतिम मुदत ५ एप्रिल

नांदेड| नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात गावपातळीवर ‘कृषी अवजार बँक’ उभारण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के, म्हणजेच कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेत उमेद व माविमद्वारे पुरस्कृत महिला बचत गट तसेच गावसंघ पात्र ठरणार असून, संबंधित गटात किमान १० सदस्य असणे आवश्यक आहे. यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी अवजार बँकेचा लाभ घेतलेल्या गटांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास निवड प्रक्रिया ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे.

निवड झालेल्या गटांना ट्रॅक्टर चलित अवजारे, बीबीएफ यंत्र, रोपणी व लावणी यंत्र, मल्चिंग मशीन, कम्बाइन हार्वेस्टर, फवारणी पंप आदी आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी करता येणार आहे. प्रकल्पाचा खर्च २० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास राष्ट्रीयीकृत बँकेकडून ७५ टक्के कर्ज घेणे बंधनकारक राहील.

इच्छुक संस्थांनी ५ एप्रिल २०२६ पर्यंत अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा नांदेड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments