HomeनांदेडNavodaya entrance exam : ऑटो चालकाच्या मुलाने नवोदय प्रवेश परीक्षेत मिळविला जिल्ह्यात...

Navodaya entrance exam : ऑटो चालकाच्या मुलाने नवोदय प्रवेश परीक्षेत मिळविला जिल्ह्यात तिसरा क्रमांक

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) मौजे सवना (ज.) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील होतकरू विद्यार्थी सुरज देविदास अनगुलवार याने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे शाळा, गाव आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले असून परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील सवना गावातील एका ऑटो चालकाचा मुलाने अत्यंत साध्या परिस्थितीत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे. अश्या हलाकीच्या परिस्थितीत सुरजने आपल्या कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्याच्या या यशामागे आई-वडिलांचे प्रोत्साहन तसेच शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

सुरजला शिक्षकांनी वेळोवेळी विशेष मार्गदर्शन, सराव परीक्षा आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करून त्याला सक्षम दिशा दिली. कोणतेही क्लासेस न लावता स्वतःच्या सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर सुरजने या स्पर्धात्मक परीक्षेत आपली ठळक छाप पाडली आहे.

IMG 20260317 WA0046 Navodaya entrance exam : ऑटो चालकाच्या मुलाने नवोदय प्रवेश परीक्षेत मिळविला जिल्ह्यात तिसरा क्रमांक

त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सतीश गोपतवाड तसेच शिक्षक हावगीराव पाटील, रेखाताई कदम, मलोजी शिंदे, मनोहर शितळे आणि विजयश्री भोसले यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. सुरजच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली असून भविष्यातही तो शिक्षण क्षेत्रात नवी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments