HomeनांदेडHoli Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर (जि. नांदेड) येथील श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कोरड्या रंगांची उधळण करत भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला.

महाशिवरात्री यात्रा उत्सवही अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उत्सवात सहकार्य करणारे जवळपास सर्वच नागरिक उपस्थित होते. हलगीच्या तालावर एकमेकांना रंग लावत, पेढे-गाठी भरवून शुभेच्छांची देवाण-घेवाण करण्यात आली.

IMG 20260303 212509 scaled Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

गावातील युवक व ज्येष्ठांच्या सहकार्याने यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा यावेळी हार व गाठी घालून सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करत होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.

IMG 20260303 212556 Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात

प्रेम, एकोपा आणि भक्तिभाव जपत सण साजरा केल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments