Homeआरोग्यEndoscopy Examination : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी...

Endoscopy Examination : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमात भाविकांची मोफत एण्डोस्कोपी तपासणी

नांदेड| “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी गॅलक्सी हेल्थ केअर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत एण्डोस्कोपी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले व एकमेव फिरते एण्डोस्कोपी रुग्णालय असलेल्या गॅलक्सी हेल्थ केअर चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सलग दोन दिवस हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या कालावधीत भाविकांची मोफत तपासणी व आवश्यक उपचार करून सेवाभावाची प्रचिती देण्यात आली.

या उपक्रमाची संकल्पना डॉ. नितीन जोशी यांनी सेवाभावी दृष्टीकोनातून राबवली असून, ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात येऊन महागड्या तपासण्या करणे शक्य नसल्याने गरजू रुग्णांपर्यंत थेट आरोग्यसेवा पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

गॅलक्सी हेल्थ केअर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना चार वर्षांपूर्वी झाली असून, संस्थेचा चौथा वर्धापन दिन उद्या दि. 26 जानेवारी रोजी साजरा होत आहे. गेल्या चार वर्षांत संस्थेमार्फत 118 मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून, 1500 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले आहेत.

endoscopy 2 Endoscopy Examination : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागमात भाविकांची मोफत एण्डोस्कोपी तपासणी

तरुण वयात पचनसंस्थेच्या गंभीर आजारांमुळे होणारे मृत्यू, तसेच उशिरा होणारे निदान टाळणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पचनसंस्थेतील जखमा व गाठींचे निदान अनेकदा शेवटच्या टप्प्यात होत असल्याने, एण्डोस्कोपीद्वारे प्राथमिक अवस्थेतच लवकर निदान व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले. या शिबिरात डॉक्टरांची तपासणी फी, रक्त तपासणी तसेच तोंडाद्वारे एण्डोस्कोपी या सर्व सेवा पूर्णपणे मोफत देण्यात आल्याने भाविक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments