नांदेडराजकीयव्हिडीओ

former MLA Madhavrao Patil Javalgaonkar : काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचा माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ

हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचा रविवारी सकाळी थाटात शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला.

शुभारंभ कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार जवळगांवकर म्हणाले की, “राजकारणात खोटं बोलून मत मागता येत नाही. गेल्या वर्षभरात विरोधकांनी काहीही काम केले नाही, आणि आता मतदानाच्या तोंडावर खोटे आरोप व दिशाभूल सुरू केली आहे. काम करताना कमी-जास्त होऊ शकतं, पण मी नेहमी पारदर्शकतेने व इमाने-इतबारे काम करत जनतेची सेवा केली आहे.” मागील काळात आमच्या पदाधिकारी यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून जनता पुन्हा काँग्रेसच्या हाथी सत्ता देईल.

588640367 3968427133301399 4370029082623309005 n former MLA Madhavrao Patil Javalgaonkar : काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाचा माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ

ते पुढे म्हणाले, “ स्व:तला उमेदवार समजून कार्यकर्त्यांनी जनतेकडे जाऊन मत मागावं. आम्ही मागील काळात हिमायतनगर शहरात विविध विकासकामे राबविली. त्या कामांचा विचार करून यावेळीही काँग्रेसला आपला विश्वास देऊन मतदान करावं,” असे आवाहन त्यांनी हिमायतनगर येथील जनतेला केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक उपस्थित होते. प्रचार कार्यालयाच्या शुभारंभानंतर काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराला आता वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच ही निवडणूक प्रमुख पक्षांच्या नेत्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरणार आहे.

जनतेने काँग्रेसच्या हातात सत्ता दिली तर उर्वरित विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नाची पराकष्टा करिन असे अभिवचन माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी देत आगमी काळात काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा जनतेसमोर घेऊन मतदान रुपी अधीर्वाद मागणार असल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलतांना जाहिर केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!