HomeनांदेडSantosh Pandagale ; पत्रकारांनी समाजातील सत्य परिस्थिती मांडणे हीच खरी पत्रकारिता -...

Santosh Pandagale ; पत्रकारांनी समाजातील सत्य परिस्थिती मांडणे हीच खरी पत्रकारिता – जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे

मुखेड l पत्रकारांनी समाजातील सत्य परिस्थिती मांडणे हीच खरी पत्रकारिता असल्याचे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार संलग्न मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष जिल्हाध्यक्ष पांडागळे यांनी मुखेड येथे दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी मराठी पत्रकार संघाच्या कार्यालय उदघाटन प्रसंगी म्हणाले.

मुखेड मराठी पत्रकार संघटनेचे कार्यालय जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या हस्ते उदघाटन करून त्यांचा पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. ते पुढे म्हणाले की, समाजात अनेक घडामोडी घडत असतात. कोणतेही वेतन नसताना पत्रकार प्रत्येक बातमी आपला जीव जोखीम घालून बातमी घेत असतो. सध्या पत्रकारांची सुरक्षेसाठी शासन एस. एम.देशमुख यांनी मागणी केलेला पत्रकार संरक्षण कायदा लागू करून पत्रकारांना न्याय द्यावा अशी भूमिका सुद्धा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा संघटक ऍड. सुनील पौळकर, मुखेड अध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड,कार्याध्यक्ष अनिल कांबळे,जेष्ठ पत्रकार अविनाश देशमुख, जेष्ठ पत्रकार शेखर पाटील, जेष्ठ पत्रकार सुशील पत्की,ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोणापुरे, जेष्ठ पत्रकार किशोर संगेवार, जेष्ठ पत्रकार शिवकांत मठपती,प्रसिद्ध छायाचित्रकार हाफिज पठाण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार सुशील पत्की यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष अनिल कांबळे यांनी मानले.

पत्रकार संघाचे ओळखपत्र वितरण

मराठी पत्रकार संघाचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, मराठवाडा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे,प्रदेश सरचिटणीस सुरेश नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी मुखेड मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र वितरण केले. नांदेड जिल्हा सरचिटणीस अनुराग पोवळे यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments