Homeनांदेडheavy rainfall : अतिवृष्टी बाधीत शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत द्या

heavy rainfall : अतिवृष्टी बाधीत शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत द्या

नांदेड| नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व ढगफुटीमुळे बाधीत झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतीचे व ईतर नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 50 हजार रूपयाची नुकसान भरपाई देवून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी निवेदन देवून केली आहे.

जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या ढगफुटी व मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी होवून खरीप हंगामातील शेती बाधीत झाली असून शेतातील सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, हळद, केळी, फळबाग पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अनेकांच्या घराची पडझड झाली आहे. पावसामुळे जमिनी खरडून गेलेल्या आहेत तसेच गुरे, ढोरे, वाहून गेल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासन निर्णय क्रमांक सीएलएस- 2022/प्र.क्र.297/म-3 नुसार शासनाने प्रचलित दरावून अधिक मदत वाढीचे दर निश्‍चित केले आहे.

त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर, 3 हेक्टर पर्यंतची मर्यादा 13 हजार 600 रूपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 27 हजार/3 हेक्टरच्या मर्यादेत, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 36 हजार/3 हेक्टरची मर्यादा असे निश्‍चित केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना प्रति हेक्टर 50 हजार रूपये नुकसान भरपाई देवून ओला दुष्काळ जाहीर करावा व 8 सप्टेंबर 2022 च्या जीआर प्रमाणे पुरग्रस्तांना नुकसानीचे वाटप करावे असे दिलेल्या निवेदनात मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी केली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments