Thursday, May 14

जागा उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था झरी येथील गुरूव्दारात – पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे -NNL

नांदेड। पोलीस भरती सुरू झाली आहे, यांसाठी येणाऱ्या उमेदवारांना असुविधा होउ नये म्हणुन राहण्या करीता ज्या उमेदवारांना जागा उपलब्ध होत नसेल त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था झरी येथील गुरूव्दारा ता. जि. नांदेड येथे करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

पोलीस भरती 2022-2023 साठी दिनांक 19.06.2024 रोजी पासुन ते दिनांक 03.07.2024 रोजी दरम्यान पोलीस मुख्यालय, नांदेड येथे सकाळी पासुन राबविण्यात आली आहे. सदर पोलीस भरती करीता अनेक उमेदवार जिल्हयातुन व बाहेर जिल्हयातुन येतात त्यांना पोलीस भरती करीता असुविधा होउ नये व राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणुन राहण्या करीता ज्या उमेदवारांना जागा उपलब्ध होत नसेल असे उमेदवार यांचे करीता राहण्याची व्यवस्था झरी येथील गुरूव्दारा ता. जि. नांदेड येथे करण्यात आली आहे. असे आव्हान श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!