HomeनांदेडFormer MP Subhash Wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्याकडून शेख कुटुबियांचे...

Former MP Subhash Wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्याकडून शेख कुटुबियांचे सांत्वन

हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगरचे माजी सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य शेख चांद शेख महेबूब (चांद सेठ) यांचे अल्पशा आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगाची माहिती मिळताच हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी गुरुवारी प्रतिष्ठित व्यापारी शेख रफिक शेख महेबूब यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

आपल्या कार्यकाळात शेख चांद सेठ यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन गाव व परिसराच्या विकासासाठी मनापासून काम केले. त्यांच्या निधनाने मार्गदर्शक, समाजाभिमुख व सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्त्व हरपल्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी यावेळी नमूद केले.

IMG20250918163746 Former MP Subhash Wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्याकडून शेख कुटुबियांचे सांत्वन
oplus_0

“शहरातील जनतेला चांद भाई यांची कमी भासू नये, याची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे. कोणतीही अडचण भासल्यास मी तुमच्या पाठीशी आहे. स्वतःसाठी भरपूर केले आहे, आता लोकांसाठी काम करण्याची ऊर्जा मिळो” अशा शब्दांत हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी रफिक सेठ यांना धीर दिला.

IMG20250918150255 Former MP Subhash Wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्याकडून शेख कुटुबियांचे सांत्वन
oplus_0

यावेळी स्वर्गीय चांद भाई यांचे चिरंजीव एस. के. निसार, एस. के. अजहर, एस. के. मजहर यांच्यासह माजी नगरसेवक शेख रहीम पटेल, मुखतार खान गुल मोहम्मद खान, मसूद खान रऊफ खान पठाण, जाविद खतीब, साई अण्णा कट्टवार, प्रभू काईतवाड, विकास नरवाडे, योगेश चिलकावार, प्रभाकर क्षीरसागर, मन्नान भाई, अनिल मादसवार आदी मान्यवर उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments