HomeनांदेडSrtmu : पत्रकार वागदरीकरांच्या पत्राची घेतली स्वारातीमवि ने दखल

Srtmu : पत्रकार वागदरीकरांच्या पत्राची घेतली स्वारातीमवि ने दखल

नांदेड| येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या द्वितीय गुणपत्रिकेवर डुप्लिकेट कॉपी एवजी द्वितीय कॉपी विद्यार्थ्यांना देण्यास भाग पाडणाऱ्या पत्रकार किशोरकुमार वागदरिकर यांचे विद्यार्थी वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठा अंतर्गत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक गहाळ झाल्या नंतर शंभर रुपये शुल्क आकारून परीक्षा विभागाकडे द्वितीय गुणपत्रकाची विध्यार्थी मागणी करण्यात येत होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाने द्वितीय गुणपत्रक देत असतांना डुप्लिकेट कॉपी असा स्टॅम्प मारून सर्रास गुणपत्रक वाटप सुरू केले होते.

IMG 20250918 WA0005 Srtmu : पत्रकार वागदरीकरांच्या पत्राची घेतली स्वारातीमवि ने दखल

ही बाब पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांना कळताच त्यांनी तात्काळ कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या कडे, डुप्लिकेट गुणपत्रिके मुळे विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण होत असल्याची तक्रार करून. गुणपत्रिकेवर डुप्लिकेट कॉपी एवजी गुणपत्रिकेची द्वितीय प्रत असे गुणपत्रक द्यावेत अशी विनंती केली होती.

IMG 20250918 083731 Srtmu : पत्रकार वागदरीकरांच्या पत्राची घेतली स्वारातीमवि ने दखल
Oplus_16908288

विद्यापीठाणे किशोरकुमार वागदरिकर यांच्या पत्राची दखल घेऊन प्र. संचालक हुशारसिंह साबळे परीक्षा व मुल्यमापन मंडळ विभागाने तात्काळ दखल घेत. द्वितीय मार्क मेमोवर डुप्लिकेट कॉपी एवजी यापुढे आता सेकंड कॉपी असा उल्लेख असलेला मार्क मेमो विद्यार्थ्यांना देत असल्याचे कळवले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments